Parbhani Crime News : चित्रपटाच्या कथेला शोभेल अशी थरारक घटना परभणी येथील एका कॉलेजच्या परिसरात घडली आहे.  कॉलेज कॅम्पसमध्ये भर दिवसा गोळीबार झाला आहे. यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी हॉस्टेल परिसर सील केला पोलिस हॉस्टेल परिसरात कसून चौकशी करत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परभणीतील पूर्णा येथील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय परिसरातील हत्येची ही थरारक घटना घडली आहे. घटनास्थळी पोलिसांना बंदूक आणि गोळी सापडली आहे. मृत तरुणाला गोळी लागली नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक रागसुधा आर यांनी दिली. 


नेमकं काय घडलं?


परभणीच्या पूर्णा शहरातील श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय परिसरात एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना  शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडलीय. घटनास्थळी मिळालेल्या पिस्टल आणि बुलेट (गोळी)सापडल्यामुळे मयतावर तत्पूर्वी गोळीबार केला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आकाश कदम अस मृत तरुणाचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून त्याचा खून झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक रागसूधा आर यांनी दिलीये.
मृत युवकाला गोळी लागली नसल्याचा दावा ही पोलीस अधीक्षकांनी केला आहे. पवार नावाच्या 23 वर्षीय तरुणाचे नाव या हत्या प्रकरणात पुढे येत आहे.  या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून शहरात तणाव पूर्ण शांतता पसरली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत, पुढील तपासासाठी श्वानपथक, ठसेतज्ञ यांना पाचारण करण्यात आले आहे.  मृत तरुण तसेच संशयीत म्हणून ज्याचे नाव पुढे आवे आहे ते दोघेही श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालय शिक्षण घेत होते की नव्हते याबाबत काहीच माहिती समोर आलेली नाही. 


पोलीसच खेळत होते  जुगार 


परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरमध्ये पोलीसच जुगार खेळत असल्याचं उघड झाले होते. यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईची प्रशंसा होतेय. परभणीत पोलीस दलात परिक्षविधीन पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून श्रवण दत्त रुजू झालेत, त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांनी खाकी वर्दीतील चार जुगाऱ्यांना गजाआड केलंय.