जयेश जगड, झी मीडिया, अकोला : अकोल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर गोळीबार झालाय. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. अकोट शहरातील कबूतरी मैदानावर दोन अज्ञात दोन हल्लेखोरांनी हा गोळीबार केल्याचं बोललं जातंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढलाय. विशेष म्हणजे घटनास्थळापासून अकोट शहर पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहेय. या हल्ल्यात पूंडकर यांना पाठीवर दोन गोळ्या लागल्या आहेत.



दरम्यान गंभीर जखमी तुषार पूंडकर यांच्यावर अकोल्यातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. घटनास्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली. याप्रकरणी अकोट शहर पोलीसांनी आरोपींच्या धरपकडीसाठी नाकाबंदी सुरू केली.