Zika virus Maharashtra | कोरोनानंतर झिका विषाणूचा धोका, पुण्यात सापडला पहिला रुग्ण
राज्यावर कोरोनानंतर (Corona) झिकाची (Zika virus) वक्रदृष्टी पडली आहे. पुण्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे.
पुणे : राज्यासाठी धक्कादायक बातमी आहे. राज्यात झिका आजाराचा (Zika virus) पहिला रुग्ण पुण्यात (Pune) सापडला आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा पहिला रुग्णही पुण्यातच (Pune) सापडला होता. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे हा झिकाचा पहिला रुग्ण सापडला आहे. सुदैवाने झिकाची बाधा झालेली ही महिला सुखरुप आहे. या महिलेच्या कुटुंबियांनाही झिकाची कोणतीही लक्षणं नाहीत, याबाबतची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. (first case of Zika virus was found Purandar tehsil in Pune district)
झिकाची लागण झालेली महिला 50 वर्षीय आहे. या आजाराची बाधा झाल्याची माहिती 30 जुलैला संबंधित प्रयोगशाळेने दिली. दरम्यान या महिलेला झिकासोबत चिकनगुनिया असल्याचंही समजत आहे.
भारतात पहिला रुग्ण कुठे?
दरम्यान देशात झिकाचा पहिला रुग्ण हा केरळात सापडला होता. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी याबाबतची माहिती दिली होती. केरळमधील 24 वर्षीय गर्भवतीला 9 जुलैला झिकाची लागण झाली होती.