पुणे : First electric ST service on Pune-Ahmednagar route : सर्वसामान्यांची लाडकी. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी, अर्थात एसटी महामंडळ आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.  एसटी 75 वर्षे पूर्ण करताना एक अतिशय पुरोगामी निर्णय घेत आहे. एसटी महामंडळाची पहिली इलेक्ट्रीक बस आजपासून पुण्यातून अहमदनगरला सोडली जाणार आहे. 'शिवाई' नावाने ही बस धावणार आहे. ( first electric bus Shivai)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एसटी महामंडळ 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य जपत एसटीने सामान्यांची अविरत सेवा 75 वर्षे केलीय. काही महिन्यांपूर्वी झालेलं आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, प्रवाशांचे हाल या गोष्टींचं गालबोट या अमृत महोत्सवी सोहळ्याला लागले आहे. पुणे - अहमदनगर मार्गावर 1 जून 1948 या दिवशी पहिली एसटी बस धावली होती. त्यावेळी त्या बसचे तिकीट अडीच रुपये एवढं होतं. लक्ष्मण केवटे हे त्याचे वाहक होते तर किसनराव राऊत हे त्या बसचे चालक होते. पहिल्या बसने 33 प्रवाशांनी पुणे नगर असा प्रवास केला होता. 


लालपरी अर्थात एसटी आज आपल्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. एसटी 75 वर्षे पूर्ण करताना एक अतिशय पुरोगामी निर्णय घेत आहे. एसटी महामंडळाची पहिली इलेक्ट्रीक बस आजपासून पुण्यातून अहमदनगरला सोडली जाणार आहे. शिवाई असे या बसचं नाव आहे. 



ई एसटी बसमध्ये आत बाहेर कॅमेरे, त्याच्या निरिक्षणासाठी चालकाच्या आसनाशेजारी एलईडी, संपूर्ण वातानुकुलीत अशी ही बस आहे. एका चार्जमध्ये ही बस 200 ते 250 किलोमीटर धावणार आहे. बससाठी उभारण्यात येणा-या चार्जिंग स्टेशनचं कामही युद्धपातळीवर सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 2 ईलेक्ट्रिक बस एसटीच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.


1 जूनपासून एसटीच्या या गाड्यामधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे 1 जून 1948 साली एसटी महामंडळाची पहिली बस पुणे ते नगर मार्गावर धावली होती. पुण्यात शंकरशेठ रस्त्यावर ज्या वडाच्या झाडाखालून ही पहिली बस धावली, तिथूनच ही बस नगरसाठी सोडण्यात येणार आहे.  एसटी 1 जून 2022 रोजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्याचं औचित्य साधत शिवाई एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होत आहे.  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे.