संघ मुख्यालयात पहिल्यांदाच एका आमदाराकडून ध्वजारोहण
नागपुरात संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच एका आमदाराने ध्वजारोहण केले. यावेळी महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.
नागपूर : नागपुरात संघ मुख्यालयात प्रजासत्ताक दिनी पहिल्यांदाच एका आमदाराने ध्वजारोहण केले. यावेळी महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते.
यांच्या हस्ते ध्वजारोहण
शिक्षक आमदार ना.गो. गाणार यांच्या हस्ते संघमुख्यालयात तिरंगा फडकविण्यात आला. संघमुख्यालयात सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत केरळ सदौ-यावर असल्यामुळे त्यांची अनुपस्थिती होती. आमदार नागो गाणारे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. ‘एका शिक्षकाला संघ मुख्यालयात बोलवून त्याच्या हस्ते ध्वजारोहण करविणे हे सर्व शिक्षकांचा सन्मान’, असल्याची प्रतिक्रियाही आमदार गाणार यांनी दिली.
मोहन भागवतांनी केलं केरळमध्ये ध्वजारोहण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी आज केरळमध्ये ध्वजारोहण केलं. पल्लकडमध्ये एका शाळेत मोहन भागवतांनी तिरंगा फडकावला. केरळमध्ये संघ आणि डावे यांच्यातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांनी केरळमध्ये जाऊन ध्वजारोहण करण्याला विशेष महत्व आहे.