COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील तळवडे फाटा इथं झाडावर गाडी आदळून मोठा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत असून ३ जण जखमी झालेत. मृत पावलेले आणि जखमी झालेले सर्व जण पुण्याचे रहिवासी आहेत. 


ताबा सुटला आणि गाडी झाडावर जाऊन आदळली


पुण्यातल्या हडपसर इथल्या राऊत आणि शेळकंदे कुटुंबीय गणपतपुळेला देवदर्शनाला खासगी गाडीतून जात होते. शाहुवाडी तालुक्यातल्या तळवडे फाट्यावरून गाडी जात असताना अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी झाडावर जाऊन आदळली. 


५ जणांचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी


यात पाच जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. मृत पावलेल्या पाच व्यक्तीमध्ये दोन पुरुष, दोन लहान मुलं आणि एक महिलेचा समावेश आहे.