आतिष भोईर, डोंबिवली : डोंबिवलीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. खदानीत बुडून एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. डोंबिवली संदप गावातील ही घटना आहे. आज सायंकाळी चार वाजता ही घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृतांमध्ये 2 महिला आणि 3 मुलांचा समावेश आहे. पाच ही जण या खदाणीत कपडे धुण्यासाठी आले असल्याची माहिती आहे. अपेक्षा गायकवाड 30, मीरा गायकवाड 55, मयुरेश गायकवाड 15, मोक्ष गायकवाड 13, निलेश गायकवाड 15 यांचा यात मृत्यू झाला आहे. 


अग्निशमन दलाच्या मदतीने पाच ही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.