पुणे : कोरोना व्हायरसने अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण कुटुंबाला संपवलं आहे. गेल्या पंधरा दिवसांत एकामागून एक जाधव कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. आई अलका जाधव, भाऊ रोहित जाधव, अतुल जाधव आणि बहीण वैशाली गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन झाले.  पूजेच्या कार्यक्रमासाठी हे कुटुंब एकत्र जमले होते. पूजेच्या कार्यक्रमानंतर घरात कोरोनाचा संसर्ग झाला. एकामागोमाग एक कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. कोरोनाने जाधव कुटुंब संपवले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  अवघ्या १५ दिवसांत संपूर्ण कुटुंबाला संपवलं आहे. यावरून कोरोनाचे भीषण रूप समोर आले आहे.


जाधव कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी घरात पूजेचं आयोजन केलं.  पूजेच्या कार्यक्रमासाठी घरातील सर्व सदस्य एकत्र आले.  प्रत्येकाला एकामागून एक कोरोनाची लागन झाली. हळूहळू प्रत्येकाची तब्येत बिघडली. अवघ्या 15 दिवसात संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाला.


पुण्यातील कोरोनाची अवस्था भयानक आहे. दररोज कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत आहे. पुण्यातील कोरोनाचे हे भयानक वास्तव समोर ठेवून हाऊसिंग सोसायटींत  बाहेरून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. 


लॉकडाऊन कडक करण्यात आला आहे आणि संचारबंदी नियम मोडणाऱ्यावर कारवाई केली जाईल. असा इशारा पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला. विशेष म्हणजे अत्यंत आवश्यक सेवांची दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केवळ मेडिकल दुकानांना सूट देण्यात आली आहे.