अलिबाग : रायगडमध्ये  एकाच कुटुंबातील ५ जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. अलिबाग तालुक्यातील आक्षीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान,  यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आक्षी या गावातील रामचंद्र पाटील (६०), रंजना पाटील (५०), कविता पाटील (२५), स्वराली आणि स्वराज (प्रत्येकी दीड वर्ष वय) या सगळ्यांनी शितपेयातून विष घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यांना अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.



राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील ११ जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याचे प्रकरण ताजे आहे. या प्रकरणामुळे देशभरात उडालेली खळबळ कायम असताना रायगड जिल्ह्यातही असाच धक्कादायक प्रकार घडल्याचे पुढे आलेय. अलिबाग तालुक्यातील आक्षी गावात एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींनी शीतपेयातून विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा संशय आहे.