नागपूर : पोलिसांवर पाच पोलीस कर्मचाऱ्यांनाच अटक करण्याची वेळ आली. नंदनवन पोलीस स्टेशनच्या पाच कर्मचाऱ्यांनी ड्रग्जच्या दलालाकडून ड्रग्ज हस्तगत केले. मात्र त्याची जप्ती न दाखवता, लाच घेऊन या ड्रग्जच्या दलालाला सोडून दिले. हे करुन हे कर्मचारी थांबले नाहीत, तर जप्त केलेले ड्रग्ज आणि लाचेचे पैसे त्यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठेवले असल्याचे पुढे आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस स्टेशनमध्ये शोध घेतल्यावर एका आलमारीत ड्रग आणि लाचेचे पैसे सापडले. सचिन एनप्रेड्डीवार, राजेंद्रर शिरभाते, दिलीप अवगण, रोशन निंबार्ते आणि अभय मारोडे अशी अटक केलेल्या पाच पोलीसांची नावे आहेत.