पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर कार आणि ट्रकचा भीषण अपघातात ९ विद्यार्थी जागीच ठार झालेत. या अपघातात कारचा चेंदामेंदा झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना गाडीत बाहेर काढणे अवघड झाले होते. हे सर्व विद्यार्थी यवतचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. काल सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते. ते घरी परतत होते. त्यावेळी हा भीषण अपघात झाला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पुणे सोलापूर मार्गावर कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर एर्टिगा आणि ट्रकमध्ये रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. ठार झालेले सगळे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. काल सकाळी सर्व यवत येथून रायगडला फिरण्यास गेले होते आणि घरी परतत होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. 


कदम वाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर सोलापूरच्या दिशेने जाणार्‍या एर्टिगा या चार चाकी गाडीतील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडीने दुभाजक ओलांडून ट्रकला समोरच्या बाजूने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे तब्बल दोन किलो मीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.