पुणे : पुण्यात चाकणमध्ये गाडीत गुदमरून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. करण पांडे असं या मुलाचं नाव होतं. सोमवारी दुपारी करण त्याच्या मित्रांबरोबर खेळत होता... खेळता खेळता तो दुपारी बाराच्या सुमाराला एका एस्टिम गाडीमध्ये बसला... त्यानंतर गाडी लॉक झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यानंतर सायंकाळी सहा वाजेपर्यंत करण कुठे आहे, याचा शोध लागला नाही. करण सहा तास गाडीत अडकून पडला होता.


दुपारचं भयंकर ऊन आणि गाडीच्या काचा बंद त्यामुळे करण गुदमरला. उन्हाच्या चटक्यांमुळे करणच्या मांडीची आणि डोक्याची कातडीही सोलली गेलेली आढळली.


पावणे सहा वाजण्याच्या सुमाराला करणच्या वडिलांना त्याचा मृतदेह गाडीत आढळला.