पुणे रेल्वे स्टेशनवरून मुलीचं अपहरण
पुणे रेल्वे स्थानकावरून ५ वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलंय.
पुणे : पुणे रेल्वे स्थानकावरून ५ वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलंय. सीसीटीव्हीमध्ये एक अज्ञात महिला मुलीला घेऊन गेल्याचं उघड झालंय. जयश्री चव्हाण असं या अपहरण झालेल्या मुलीचं नाव आहे. उषा आणि जयसिंग चव्हाण हे नागपूरवरून रोजगाराच्या शोधात पुण्यात आले होतं. स्टेशन बाहेरील दर्ग्याजवळ हे कुटुंब थांबलं होतं. त्यावेळी जयश्री आणि तिचा भाऊ परिसरात खेळत होते. त्यावेळी या मुलीचं अपहरण झालंय. २१ तारखेला ही घटना घडलीय. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणावरून एका लहान मुलीचं अपहरण झालं होतं. त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय.