मुंबई : जंगलात राहणाऱ्या पशु पक्ष्यांमध्ये भांडण ही तर कायम आहेत. त्यांची ती भांडण जेव्हा कॅमेऱ्यात कैद होतात तेव्हा त्यातील भीषणता जास्त स्पष्ट होते. महाराष्ट्राच्या विदर्भातील एका फोटोग्राफरने गरूड आणि सापाच्या वादाचे फोटो कॅमेऱ्यात कैद केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


नागपूरच्या पेंच टायगर रिझर्वमध्ये गरूड आणि साप यांच्यात भयानक वाद पाहायला मिळाला. आकाशात उडणाऱ्या गरूडाने जमिनीवर सरपटणाऱ्या सापाला तोंडात घेऊन पुन्हा झाडाच्या फांदीवर बसणं योग्य समजलं. 



चोचीत सापाला उचलून गरूडाने झाडावर बसणं पसंद केलं. गरूडाने जसं सापाला तोंडात घेतलं अगदी तशीच त्यांच्यात लढाई सुरू झाली. 



आपला जीव वाचवण्यासाठी सापाने भरपूर संघर्ष केला. क्रेस्टेड सर्पेंट ईगल नस्ल या गरूडाने स्ट्राइप्ड कील बँक सापात ही लढाई पाहायला मिळाली. 



थोड्यावेळाने ही लढाई संपली... अखेरीस गरूडाने सापाला खाऊन टाकलं.