मुंबई / पुणे : मुंबई, पुण्यासारख्या शहरांत भर दुपारी धुकं दिसत असल्यानं नागरिकांना बरं तर वाटतंय... पण, एक सततच्या बदलत्या वातावरणामुळे आपल्या आप्तेष्ठांच्या आरोग्याविषयीच्या काळजीनं एक वेगळीच धास्तीही नागरिकांत दिसून येतेय.


रेल्वे सेवेवर परिणाम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत सर्वत्र धुकं पहायला मिळालं. या धुक्याचा परिणाम रेल्वे सेवेवरही झाला. धुक्यामुळे रस्ते वाहतूकही मंदावली. तर मध्य रेल्वेच्या गाड्या सकाळी १० ते १५ मिनिटांनी उशीरानं धावत होत्या. वसईतही पहाटेपासून सर्वत्र धुकं पसरलं होतं. सकाळी सात ते साडे सातपर्यंत हे धुक पहायला मिळालं. धुक्यामुळे भाईंदर खाडीचा ब्रिजही दिसत नव्हता. मात्र सकाळी मॉर्निंगवॉक करणाऱ्या नागरिकांना मात्र या धुक्याचा आनंद घेतला.


दैनंदिन व्यवहारावर परिणाम


मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानात झालेल्या घसरणीमुळे शहरातल्या गारठयात वाढ झाली असतानाच दुसरीकडे शनिवारी सकाळी धूळ आणि धुके यांच्या मिश्रणामुळे वातावरणात तयार झालेल्या धूरक्याचा मुंबईच्या दैनंदिन व्यवहारांवर विपरित परिणाम झाला. ऐन सकाळी पसरलेल्या धूरक्याचा फटका रस्ते आणि रेल्वे वाहतूकीला बसला. याचा परिणाम म्हणून भल्या पहाटे रस्ते आणि रेल्वे वाहतूक धीम्या गतीने सुरु होती.


वाशिंद स्थानकात रेल रोको 


दाट धुक्यामुळे सलग दुस-या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे वाशिंद रेल्वे स्थानकात प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलं. तबब्ल एक ते दीड तासानंतर वाहतूक सुरु झाली. लोकल उशिरा असल्यानं प्रवासी संतप्त झाले. सकाळी पावणे सातपासून लोकल वाहतूक ठप्प होती. त्यातच लांब पल्ल्याची रेल्वे पुढे सोडल्यानं प्रवाशांचा संतापाचा उद्रेक झाला. शुक्रवारीसुद्धा मध्य रेल्वेची वाहतूक धुक्यामुळे उशिराने होती. 


पुण्यातही धुकं...


पुणेही धुक्यात हरवलेलं पहायला मिळतंय. रस्त्यावर लांबून काहीच दिसत नाही. इमारतीही धुक्यात हरवल्यात. तर पिंपरी चिंचवडची सकाळ धुक्याने अच्छादलेली होती... शिमला मनालीप्रमाणे शहरावर धुक्याची चादर पांघरली होती. 


 

<iframe width="970" height="545" src="https://www.youtube.com/embed/ym80qEsQ1RU" frameborder="0" gesture="media" allow="encrypted-media" allowfullscreen></iframe>