Adultration in Paneer: सणांचे दिवस आहेत. गणपती अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेत. अशात तुमच्या घरी नातलग किंवा पाहुणे आल्यानंतर जेवणाला काय करायचं याचे बेत ठरत असतील. गणपतीचे दिवस असल्याने घरी नॉन व्हेज जरा कमीच होतं. अशात पनीरची मागणी प्रचंड वाढते. मात्र,  पनीर घेताना जरा सावध राहा. कारण हेच पनीर तुम्हाला आजारी पाडू शकतं. याच पनीरमुळे तुम्हाला थेट हॉस्पिटल गाठायची वेळ येऊ शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही, आम्ही तुम्हाला सावधान करत आहोत. कारण, नाशिकमध्ये घडलेला प्रकार भयावह आहे. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थ सर्रास विकले जातात. यामध्ये पेढे, मिठाई, मिठाईसाठी लागणार खवा, पनीर यासारख्या पदार्थांमध्ये सर्वाधिक भेसळ होते.  याच भेसळखोरांवर नाशिकच्या अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. 


नाशिकमध्ये अन्न व औषध प्रशासनानं धडक कारवाई करत 12 लाखांचा बनावट पनीरचा साठा जप्त केलाय. सणासुदीच्या काळात भेसळयुक्त पदार्थांचा सुळसुळाट वाढत असल्यानं अन्न वऔषध प्रशासनानं मोठी मोहिम सुरु केलीय. याअंतर्गत नाशिकमधील अंबड परिसरात या बनावट पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी पनीर तयार करण्यासाठी रिफाइंड पामोलीन तेलाचा वापर होत असल्याचं निदर्शनास आलं. 


food and drugs department seized adultrated paneer worth 12 lakhs from nashik