औरंगाबादेत जेवणातून विषबाधा, एकाच कुटुंबातील पाच जणांना बाधा तर दोघांचा मृत्यू
जिल्ह्यातील सोयगाव इथे एकाच कुटुंबातील पाच जणांना जेवणातून विषबाधा झाल्यानं दोघा बहिणींचा जळगावात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
औरंगाबाद : जिल्ह्यातील सोयगाव इथे एकाच कुटुंबातील पाच जणांना जेवणातून विषबाधा झाल्यानं दोघा बहिणींचा जळगावात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वांग्याची भाजीतून विषबाधा
या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडालीय. सोयगाव इथल्या राजू राठोड यांच्याकडे वांग्याची भाजी केली होती. त्यातून विषबाधेची घटना घडल्याचं पुढे येतंय. मुलांना शाळेत उलट्या झाल्यानंतर विषबाधीत 13 वर्षाची ज्योती, 9 वर्षाचा मोगली, 10 वर्षाचा राहुल, पत्नी कावेरीबाई तसेच पुतण्या दिनेश दिलीप राठोड यांना तत्काळ उपचारासाठी पिंपळगाव हरेश्वरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आलं.
दोघांवर उपचार सुरु
उपचारानंतर सर्वाना घरी पाठविण्यात आले. मात्र त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्यान उपचारासाठी जळगावला हलविण्यात आले. उपचारादरम्यान मोगलीचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ ज्योती हिचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे भयभीत झालेल्या कुटुंबियांनी तत्काळ दिनेश राठोड या बालकास खासगी रुग्णालयात हलविले. सिव्हीलमध्ये कावेरीबाई तसेच राहुल राठोड या दोघांवर उपचार सुरु आहेत.
प्रारंभी वांग्याच्या भाजीतून विषबाधा झाल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. परंतु यामागे काही वेगळ कारण आहे का याचीही चौकशी करण्यात येतेय.