चिपळूण :तेजस एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधेचा त्रास झाल्यामुळे चिपळुण स्थानकाजवळ तेजस एक्स्प्रेस थांबवण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

करमाळीहून मुंबईच्या दिशेने तेजस एक्सप्रेस निघाली होती. मात्र, रत्नागिरी स्थानक सोडल्यानंतर यातील काही प्रवाशांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यामुळे ट्रेन चिपळूण स्थानकात आल्यानंतर थांबण्यात आली.


यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या. एक-एक करत उलटीचा त्रास होत असलेल्या रुग्णांना खासगी दवाखान्यात हलवण्यात आलंय. याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून आतापर्यंत 40 प्रवाशांना याचा त्रास झालाय. ट्रेनमधील बिर्याणी खाल्यामुळे त्रास झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.