औरंगाबाद :अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या अडचणीत वाढ होणयाची चिन्हे आहेत. औरंगाबाद न्यायालयाने त्यांच्यावर कर्तव्यात कसूर आणि मंत्री पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला आहे. स्वस्त धान्य दुकानाशी संबंधित एका निकालाच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या विरुद्ध हा निर्णय दिला आहे. त्यामुळे भाजपची गोची झाली आहे. २०१६ च्या एका प्रकरणात तात्कालीन तहसीलदार आणि पुरवठा अधिकारी यांनी काही स्वस्त धान्याची दुकानांची चौकशी करून नियमाची पायमल्ली करत असल्याने बंद केली होती. मात्र हा निर्णय गिरीश बापट यांनी रद्द करून त्या दुकानदारांना पुन्हा एकदा संधी दिली होती.


मंत्री पदाचा गैरवापर 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती आणि याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. चौकशीअंती कारवाई केली तर ती योग्य आहे आणि तो निर्णय मंत्रीमहोदयांनी का रद्द करावा ? हे कळत नसल्याचं मत न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळेच ही कर्तव्यात कसूर आणि मंत्री पदाचा गैरवापर असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे आणि मंत्र्यांनी घेतलेला निर्णय न्यायालयाने रद्द केलाय.


अजित पवारांची टीका 


या दरम्यान विरोधकांनी भाजप सरकारवर निशाणा साधण्याची संडी सोडली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना विचारले असता, गिरीश बापटांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही कारण हे सरकारचं भ्रष्टाचारी मंत्र्यांना पाठीशी घालणार आहे, असे ते म्हणाले.