Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीला आता राजकीय धार आली आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या मागणीसाठी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी पहिला राजीनामा दिला आहे. ते शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत. लोकसभा अध्यक्षांच्या नावानं त्यांनी राजीनाम्यांचं पत्र दिले. मराठा आंदोलकांनी हेमंत पाटलांची भेट घेऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तेव्हा त्यांनी तात्काळ राजीनामा लिहून दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर, दुसरीकडं जुन्नरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांनीही मराठा आरक्षणासाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवलीय. मराठा आरक्षणाच्या लढ्यात ते उतरलेत. आपण लवकरच मराठा संघटनांशी चर्चा करून राजीनाम्याचा निर्णय घेणार असल्याचं आमदार बेनकेंनी सांगितलं. 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू झालेलं आंदोलन चांगलंच पेटले आहे. गावबंदी आंदोलनाचा तर राजकीय नेत्यांनी धसकाच घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून शरद पवारांपर्यंत आणि खासदार-आमदारांपासून ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत सर्वांनाच गावबंदी करण्यात आली. अनेक नेत्यांच्या गाड्या मराठा आंदोलकांनी अडवल्या. काहींना काळे झेंडे दाखवले. गो बॅकच्या घोषणा दिल्या.  काही नेत्यांच्या तर गाड्या फोडून खळ्ळ खटॅक करण्यात आले.


मराठा समाजाचा हा रोष आगामी निवडणुकांमध्ये नेत्यांना महागात पडू शकतो... त्यामुळंच मराठा आरक्षणासाठी राजीनामा देत असल्याचं खासदार-आमदार सांगत असले तरी प्रत्यक्षात मतनाट्यासाठीच हे राजीनामा नाट्य आहे की काय, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.


सर्वच राजकीय पुढा-यांना षंढासारखं घरात बसण्याची वेळ


मराठा समाजाचा आरक्षण मागणीवरुन एकंदरीतच राग आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पुढा-यांना षंढासारखं घरात बसण्याची वेळ आल्याची खंत, भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये केली. कोणत्या तोंडाने आम्ही लोकांसमोर जायचं हा प्रश्नच असल्याचं त्यांनी म्हंटलंय. 


इंदोरीकर महाराजांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा


इंदोरीकर महाराजांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे.  मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी  इंदोरीकर महाराजांनी उद्या पासून पुढचे 5 दिवस सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी इंदोरीकर महाराज यांनी उद्यापासून पुढचे 5  दिवस एकही कार्यक्रम व कीर्तन न करण्याचा घेतला निर्णय घेतला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.