Sangli Jat :  सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळी गावांमध्ये पहिल्यांदाच कृष्णा नदीच पाणी पोहचले आहे. म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून हे पाणी मिळाले आहे. यामुळे दुष्काळाच्या छायेत असलेल्या नागरीकांना तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पहिल्याच थेट गावात पाणी पोहचल्याने ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पहायला मिळाला. 


पाण्याचे जल्लोषात स्वागत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रथमच आलेल्या पाण्याचे ग्रामस्थ आणि शेतकरऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले आहे. एकुंडी, शेळकेवाडी आणि वज्रवाड येथे पाईपलाईनच्या माध्यमातून कृष्णेचे पाणी पोहचले आहे. यावेळी शेतकऱ्यांनी पाणी येताच थेट कृष्णेच्या पाण्यात मनसोक्त डुंबून पाण्या सोबत सेल्फी देखील काढला. जतचे आमदार विक्रम सावंत यांच्या हस्ते यावेळी पाणी पूजन पार पडले. पावासाने दडी मारल्याने दुष्काळयाच्या छायेत असणाऱ्या गावांना पहिल्यांदा पाणी मिळाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
सांगली जिल्हयातील पूर्व भागाकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. वाढत्या पाणी टंचाईमुळे जिल्ह्यातील अनेक गावांवर दुष्काळाची गडद छाया निर्माण झाली आहे. पाण्याअभावी हातातोंडाशी आलेली पिकंही करपून गेली. 


सहा महीने बंद होती म्हैसाळ जल सिंचन योजना 


थकीत वीज बिलासाठी मागील सहा महीने म्हैसाळ जल सिंचन योजना बंद होती. योजना बंद असल्यानं जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली.  शेती पिकांच नुकसान सुरू झालं. या बाबत विरोधकांनी आंदोलन केलं. अखेर सरकारनं या योजनेसाठी 15 कोटी रुपये मंजूर केले.. यातून थकित वीज बिल भरण्यात येत आहे. या निर्णयामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्यात आली आहे. 


जत तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करण्याची मागणी


नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात देखील जत तालुक्याच्या दुष्काळाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. जत तालुक्याला दुष्काळी तालुका जाहीर करा अशी मागणी विरोधकांनी विधानसभेत लावून धरली होती. आमदार विक्रम सावंत यांनी विधान भवनाच्या पाय-यांवर आंदोलन केल होते. त्यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही आंदोलनात सहभागी झाले होते. जत तालुक्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण सभागृहात नाना पटोले आणि आमदार विश्वजीत कदमांनी करून दिली.