वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि जळगाव जिल्ह्यात दबदबा असणारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची प्रकृती बिघडली आहे. प्रकृती बिघडल्याने खडसेंची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. खडसेंची तब्येत बिघडल्याने कुटुंबियांची आणि त्यांच्या समर्थकांची चिंता वाढली आहे. (former bjp senior leader eknath khadse health deteriorated due to low blood pressure at jalgaon)  


नक्की काय झालं?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडसेंचा दूध संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्याच पोलीस टाळाटाळ करत होते. त्यामुळे खडसेंनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केलं. खडसेंनी जळगाव पोलीस स्टेशनमध्ये 4 तासांपासून ठिय्या आंदोलन करत गुन्हा नोंद करावा, अशी मागणी करण्यात येत होती. 


या दरम्यान पोलीस निरीक्षकांच्या दालनात खडसेंची प्रकृती बिघडली. रक्तदाब कमी झाल्यानं खडसेंची तब्येत बिघडल्याचं सांगितलं जातंय. खडसेंची प्रकृती बिघडताच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दरम्यान खडसेंची प्रकृती बिघडल्याने त्यांच्या चाहत्यांची चिंता वाढलीय.