मुंबई : 26 जुलै 2021 रोजी IPS अधिकारी वैभव निंबाळकर (IPS Vaibhav Chandrakant Nimbalkar) हे आसाम-मिझोरम बॉर्डर वादात जखमी झाले होता. वैभव निंबाळकर यांच्या डाव्या मांडीवर गोळी लागली होती. दोन यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर अधिकारी वैभव निंबाळकर हे चालू लागले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईशान्य भारतातील आसाम आणि मिझोरमच्या सीमेवर दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये रक्तरंजित हिंसा झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये आसाम पोलिसांचे 6 जवानांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये cachar जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्यासह 50 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 



पोलिस अधिक्षक वैभव निंबाळकर यांच्या मांडीच्या हाडात प्रचंड फ्रॅक्चर झाले होते. त्यानंतर त्यांना तात्काळ सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर त्यांना विमानाने मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथे त्यांच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या. 



अनेक शस्त्रक्रियांना उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर वैभव निंबाळकर आपल्या पायांवर उभे राहिले आहेत. त्यांची पत्नी अनुजा वैभव यांनी वैभव निंबाळकर यांचा वॉकर घेऊन चालणारा फोटो पोस्ट केला आहे. 


'आता त्यांच्या प्रकृतीत उत्तम सुधारणा होत आहे. वैभव निंबाळकर स्वतःच्या पायांवर काही पाऊले वॉकरच्या मदतीने पुढे टाकत आहे. पुढच्या दिवसांत फिजिओथेरपी आणि रिहॅबिलेशन याकडे लक्ष केंद्रीत केलं जाईल', असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.