देवरुख मातृमंदिर संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा शांता नारकर यांचे निधन
रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील देवरुख (Devrukh) येथील मातृमंदिर संस्थेच्या (Matrumandir Sanstha) माजी कार्याध्यक्ष आणि संस्थेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावली.
मुंबई : रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील देवरुख (Devrukh) येथील मातृमंदिर संस्थेच्या (Matrumandir Sanstha) माजी कार्याध्यक्ष आणि संस्थेच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावलेल्या शांता नारकर यांचे शुक्रवारी संध्याकाळी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. शांताबाई यांच्या निधनाने मातृमंदिर परिवाराची खूप मोठी हानी झाली आहे, अशी प्रतिक्रिया सर्वस्तरातून व्यक्त होत आहे. शांताबाई म्हणून त्या विशेष लोकप्रिय होत्या. ( Shanta Narkar passed away at Devrukh )
सामाजिक बांधिलकी आणि संवेदना ठेवून मोलाचे कार्य करणाऱ्या देवरुख मातृमंदिर संस्थेच्या माजी कार्याध्यक्षा शांता विजय नारकर यांनी 16 एप्रिल रोजी रात्री 7.45 वाजता अखेरचा श्वास घेतला. पती विजयभाऊ यांच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत त्यांनी मातृमंदिर संस्थेला मोठ्या उंचिवर नेले आहे. न्यू इंग्लिश स्कूल देवरुखच्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कोकणच्या मदर तेरेसा मावशीबाई हळबे यांच्या सानिध्यात त्यांनी काम केले आहे. त्यांना कै.रामविलास लाहोटी स्मृती आदर्श शिक्षिका पुरस्कार, गुरुवर्य अ.आ,देसाई ट्रस्टचा पुरस्कार, महाराष्र्ट शासनाचा पुण्यश्लोक अहिल्या होळकर पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. अनेक संस्थावर पदाधिकारी म्हणूनही त्यांनी उत्तम काम पाहीले आहे. स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.
विशेषतः दहावी नापास मुलींसाठी चांगले कार्य करुन 'मनाली' हा अनौपचारीक प्रकल्प सुरु केला होता. शांताबाई म्हणून त्या विशेष लोकप्रिय होत्या. त्यांनी अनेक पुस्तके लिहीली, संपादित केली. 'क्षण कसोटीचे' हे त्यांचे पुस्तक गाजले. पती विजय नारकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी भाऊंच्या जीवनावरील 'कातळावरचा तपस्वी 'हे पुस्तक संपादित केले.