Anil Parab Sai Resort Case : महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दापोलीमधील साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Case) अडचणीत सापडलेल्या परब यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी परबांविरोधात पुरावे सादर करत हे प्रकरण लावून धरलं आहे. परंतु सध्याला तरी खेड इथल्या अतिरिक्त सत्र कोर्टाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. (Former Transport Minister Anil Parab granted anticipatory bail in Sai Resort case)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटाचे माजी परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.  माजी मंत्री अनिल परब यांच्यासह तिघांवर आयपीएस कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली होती. 


अनिल परब (Anil Parab) यांच्यावर फसवणूक आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मंत्रिपदाचा दुरुपयोग करत शेतजमिनीवर तीन मजली रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. शेतजमिनीचे बिगर शेती जमिनीत रुपांतर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परब यांनी कदम यांना हे रिसॉर्ट विकल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.


दरम्यान, सोमय्या परब यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे परब हे वारंवार रिसॉर्ट त्यांचं नसल्याचा दावा करत आहेत. मात्र गुन्हा दाखल झाल्याने ते अडकले गेले आहेत.