चंद्रपूर : माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील सुरक्षा वाहनाला अपघात झाला आहे. चंद्रपुरहुन नागपुरला जात असताना हा अपघात झाला. या अपघातातून अहिर थोडक्यात बचावले, मात्र वाहनातील दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहिर चंद्रपूरहून निघाले होते. चंद्रपूर-नागपूर महामार्गाहून पुढे जाताना तांडळी पूल पार केला. त्यानंतर अहिर पुढे गेल्यावर मागच्या ताफ्यातील वाहनाची कंटेनरला धडक बसली.


या धडकेत विनोद झाडे (पोलीस) आणि फलजीभाई पटेल (सीआरपीएफ) जवान या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच तीन जवान गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.