पुणे : पुण्यात आजचा सोमवार हा घातवार ठरलाय. पहाटे पासून 11 वाजेपर्यंत चार विचित्र अपघात झालेय. पुणे बंगळुरू महामार्गावर कात्रज बोगद्याकडून नऱ्हेच्या दिशेने जाताना भूमकर पुलावर आज पहाटे दोन ट्रकचा भीषण अपघात झाला. दारुची वाहतूक करणाऱ्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात झालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यात एक गंभीर जखमी तर दोन किरकोळ जखमी झालेय. दरम्यान हा अपघात झालेला असतानाच काही अंतरावर स्पेअरपार्ट वाहतूक करणारा आयशर देखील उलटला असून दुसरा अपघात झालाय. तर तिसरा अपघात नऱ्हे येथील अपघाताची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी जात असताना भरधाव कंटनेरने सिंहगड पोलिसांच्या गाडीला उडविले. 



गाडीचा चुरडा झाला असून कोणीही जखमी झाले नाही. तर नवीन कात्रज बोगदा दरी पुलाकडून साताऱ्याहून-मुंबईकडे जाणाऱ्या आणखी एका कंटेनरने 4 वाहनांना उडवले. यामध्ये एका रिक्षा आणि पोलिसांच्या गाडीचा चुरडा झाला असून सहा महिन्यांच्या बाळासह तीन जण जखमी झालेत. 


जखमींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय दोन जणांचा या अपघातात मृत्यू झाला असून एकूण आज चार अपघात झालेय.