प्रशांत परदेशी, झी मीडिया, नागपूर: सध्या रस्त्यांवर खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात यांमुळे सध्या नागरिक हैराण आहेत. यामुळे आता महामार्ग आणि रस्तेबांधणीवरील कामांमध्ये सुधारणा करणं आवश्यक ठरतं आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गावरील दुरस्तीला घेऊन ग्रामस्थ गंभीर झाले आहेत. सध्या नागपूर - सुरत  महामार्गवरून खड्डयांमुळे अपघांतांचे (Accidents) प्रमाण वाढले आहे त्यामुळे सध्या ग्रामस्थांनी अल्टिमेटम दिला आहे. (four cars got broke by unknown persons in city of gondia at late night car owner files complaint)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर - सुरत महामार्ग धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात वाहन चालकांसाठी नरक यातना देणारा ठरत आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे (National Highway) काम गेले अनेक वर्षापासून संथ गतीने सुरू आहे. ज्या ठिकाणी या मार्गाचे काम झालेलं आहे, त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांच साम्राज्य निर्माण झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करत, वाहन चालवावे लागत आहे. वारंवार तक्रारी, निवेदन देऊनही या राष्ट्रीय महामार्गाचे दुरुस्ती केली जात नसल्याने विसरवाडी ग्रामस्थांनी आंदोलन (Protest) करण्याचा इशारा दिला आहे. विसरवाडी गावाच्या हद्दीतील नवापूर कडून रिलायन्स पेट्रोल पंप ते सरपणी नदी पुलापर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू असून, ह्यावर्षीच्या पावसाळ्यात रस्त्यावर ठिकाणी ठिकाणी लहान मोठे खड्डे पडल्याने सर्विस रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. 


viral video: आईवडिलांनी मुलीसाठी पुढे केली संरक्षणाची ढाल... बदनामी केल्यानं जावयाची अब्रु वेशीवर!


जाणून घ्या नेमकं प्रकरण : 


राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेणारी संबंधित ठेकेदार या सर्विस रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर कायमस्वरूपी डांबरीकरण न करता केमिकल मिश्रीत खडी व माती टाकुन तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याचे काम केले आहे. या मार्गाने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांसह चारचाकी प्रवासी वाहनांची 24 तास वाहतूक मोठ्यासंख्येने होत असल्याने या महामार्गावर वाहतूक कोंडी, खड्डेमुळे अपघात तसेच मोठ्या प्रमाणात बस स्थानक परिसरात धुळीचा सामना व्यावसायिक व नागरिकांना करावा लागत आहे. 


मित्रानेच केला घात! जिगरी दोस्ताचा अश्लील व्हिडीओ बनवत त्याने... पुण्यातील घटना!


उड्डाणपूलाचा पर्यायी रस्ता (सर्विस रोड) पूर्णपणे उखडून गेल्याने खड्ड्यांमधून माती व दगड (Stone) वर आली आहे. येथून वाहने गेल्याने प्रचंड प्रमाणात धूळ व दगडे उडत आहे. महामार्गाचा धुरळा झाला आहे. या महामार्गाची दुरुस्ती न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.