कराडजवळ साखर कारखान्याची साडेचार कोटींची रोकड पळवली
साताऱ्याच्या कराडजवल साडेचार कोटी रुपयांची रोकड पळवण्यात आली आहे.
सातारा : साताऱ्याच्या कराडजवल साडेचार कोटी रुपयांची रोकड पळवण्यात आली आहे. विजापूर येथील ज्ञानयोगी शिवकुमार साखर कारखान्याची ही रोकड होती. मुख्य म्हणजे पोलीस असल्याचं सांगून चोरट्यांनी ही रोकड लंपास केली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर ही घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी जिल्ह्यात नाकाबंदी लावली आहे. साखर कारखान्याचे कर्मचारी हे सगळे पैसे घेऊन पुण्याच्या दिशेनं जात होते. त्यावेळी त्यांची स्कॉप्रिओ गाडी अडवण्यात आली आणि साडेचार कोटी रुपये झटापट करून पळवण्यात आले. साखर कारखान्यातील दोन गटांमधल्या वादामुळे हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे.