कोल्हापूर : गोविंदराव पानसरे हत्येच्या वेळी घटनास्थळावर दोघे नाही तर चौघे उपस्थित होते, अशी विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी कोर्टात माहिती दिलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी, प्रत्यक्षदर्शीनं आरोपी समीर गायकवाडलाही ओळखलंय. 'पानसरे यांची हत्या करण्यासाठी चौघे उपस्थित होते. त्यामध्ये समीर गायकवाडही उपस्थित होता' असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय.   


तसंच नरेंद्र दाभोलकर, गोविंदराव पानसरे, प्राध्यापक कलबुर्गी यांच्या हत्येच्या वेळी वेगवेगळे रिव्हॉल्व्हर वापरलं होतं, असा अहमदाबाद बॅलेस्टीकचा रिपोर्ट आहे.


कोल्हापूऱ जिल्हा सत्र न्यायालयात या संदर्भात सुनावणी सुरू आहे. समीर गायकवाड हा हत्येच्या कटात आणि प्रत्यक्ष हत्येत सहभागी होता असं न्यायालयात सांगण्यात आलंय.


'गायकवाडला जामीन नको'


या खटल्यातील आरोपी समीर गायकवाड याला जामीन दिला तर साक्षीदारांवर दबाव आणला जाईल, असं म्हणत सरकारी वकिलांनी गायकवाडचा जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केलीय. यापूर्वीही, अॅड. पुणाळेकर यांनी या प्रकरणातील साक्षीदारावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता... त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल आहे... त्यामुळे समीर गायकवाड याला जामीन देणं योग्य होणार नाही, असं त्यांनी कोर्टासमोर स्पष्ट केलं.