रत्नागिरी : शहरात सक्रिय असणाऱ्या 'अथर्व फॉर यू इन्फ्रा अँड एग्रो' कंपनीची रत्नागिरीमधील कोट्यवधीची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. जिल्ह्यात अथर्व कंपनीने  रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केल्याचे समोर आल्यानंतर कंपनीचे फ्लॅट आणि जमिनी आर्थिक गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अथर्व इन्फ्रा' या कंपनीमध्ये रत्नागिरीतील गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अथर्व कंपनीच्या राज्यभरात ४० शाखा उघडण्यात आल्या होत्या. 


पनवेल, मुंबई, ठाणे, सांगली, रत्नागिरी येथील कार्यालयांचा समावेश आहे या कंपनीने गोवा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक आदी राज्यात पाय पसरले होते. मात्र आपलं हीत साध्य होताच कंपनीनं गाशा गुंडाळला. त्यानंर गुंतवणूकदारांनी फसवणूक झाल्याची तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेत जप्तीची कारवाई करण्यात आली. 


'अथर्व इन्फ्रा' कंपनी रत्नागिरीत गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ कार्यरत होती. मात्र आपले हित साध्य होताच कंपनीने आपला गाशा गुंडाळला. महाराष्ट्रासह अनेक राज्यात 'अथर्व इन्फ्रा' कंपनीने शाखा उघडल्या होत्या. कंपनीची कोट्यवधींची मालमत्ता पोलिसांनी जप्त केली आहे.