मुंबई : cyclonic storm : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, राज्यात तापमान आणखी वाढ होण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या तापमानाची विदर्भाला सर्वाधिक झळ बसली आहे. चंद्रपुरात 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. (cyclonic storm is likely to form over Bay of Bengal)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात उन्हाचे चटके आणखी वाढणार आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसांत ते चक्रीवादळात रूपांतर होईल. त्याचा परिणाम म्हणून उष्णतेची लाट येणार आहे. त्यात गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि ओडिशात खूप जास्त तापमान नोंदवण्याची शक्यता आहे. 


आठवड्याच्या शेवटी कधीही बंगालच्या उपसागरावर (Bay of Bengal) चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र झाले असून पूर्व-ईशान्येकडे सरकले आहे आणि सध्या आग्नेय बंगालचा उपसागर आणि विषुववृत्तीय हिंदी महासागरावर आहे. पुढील 24 तासांत ते आणखी पूर्व-ईशान्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. तसेच ईशान्येकडे चालू असलेल्या तीव्रतेने आणि वाढत्या बदलामुळे, ते 20 मार्च रोजी अंदमान समुद्र आणि खाडी बेटांवर चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. 



वाढत्या तापमानाची झळ विदर्भाला सर्वाधिक बसली आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम भारत आणि पश्चिम मध्यप्रदेशातील अनेक भागांमध्ये कमाल तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचा मोठा परिणाम महाराष्ट्रावर होईल. राज्यात अनेक ठिकाणी पारा 40 अंशांच्या पार गेलाय. तापमानात आणखी वाढ होणार आहे.