मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतील रुग्णालयात मोफत उपचार होतील. यासंदर्भात विशेष आदेश जारी करण्यात आले आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय.  उपचारासाठी पैसे घेतले तर ५ पट दंड लावण्याचा, परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही ते म्हणाले. महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतून श्वसनासंबंधित २० आजारांसाठी मोफत उपचार होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांची राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांशी चर्चा झाली. या बैठकीतगणेशोत्सव, कोरोनाविरोधात लढा आणि अडचणी यावर चर्चा झाली. 


सार्वजनिक गणपती कमीत कमी बसतील त्यावर लक्ष द्यावे. आगमन आणि विसर्जनाची मिरवणुकीवर मर्यादा हवी. सामाजिक उद्देश घेऊन गणेशोत्सव साजरा व्हावा आवाहन राजेश टोपे यांनी केले. 


जिमबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. आपत्कालीन व्यवस्थापन कायद्यानुसार कोणत्या गोष्टी शिथिल करायच्या याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. जिम सुरू झाल्या पाहिजेत हे माझंही मत आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. मी मुख्यमंत्र्यांकडे याबाबत आग्रही भूमिका मांडेन असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. 
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती, समाज प्रबोधन यावर भर द्यावा. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव मंडळाने सॅनिटायझ करायला हवं.राज्य सरकारने लोकहिताचे जे निर्णय घेतले आहेत  त्याची माहिती गणेशोत्सव मंडळानी द्यावी असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मोहरमही सर्व नियम पाळून केला पाहिजे असेही ते म्हणाले. 


शेवटच्या क्षणी आलेल्या रुग्णांचं प्रमाण मृतांमध्ये जास्त आहे. ग्रामीण भागात अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आरोग्य विभागातील वर्ग क आणि ड ची भरती लवकर लवकर केल्या जातील अशी माहिती टोपे यांनी दिली.



एसडीआरएफचा निधी आधी पूर्ण वापरा, जिल्हा नियोजन निधीतील ३३ टक्के रक्कम वापरण्याची मुभा उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत, त्यामुळे निधी कमी पडणार नाही असेही टोपे म्हणाले. 


महत्वाचे मुद्दे 


-आपल्याकडे आहे त्या ठिकाणी सुविधा वाढविण्यावर भर दिला जाणार
डॉक्टरांची संख्या कमी आहे
 स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता जाणवते आहे
- टेलि आयसीयूचा प्रयोग सहा जिल्ह्यात करतोय
- भिवंडीत प्रत्यक्ष सुरू झाला आहे
- कोविडचे तज्ज्ञ डॉक्टर ऑनलाइन मार्गदर्शन यामुळे देऊ शकतात
 रेमडेसेवीर इंजेक्शन्सचा परिणाम चांगला जाणवतो त्याची उपलब्धता वाढवण्याबाबत चर्चा झाली
वाढणार्‍या संख्या नियंत्रणात आणण्यासाठी संपर्क शोधणे महत्त्वाचे
- हे प्रमाण वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत
- टेस्टिंग वाढवण्याच्याही  सूचना दिल्या आहेत
मृत्यूदर १ टक्क्याच्या आत आणण्याच्या आमचा हेतू आहे
सगळ्यांनी मिशन मोडवर काम करण्याचे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना केले आहे
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत, एकास २० हवे, काही ठिकाणी ८


मृत्यूदर जास्त असलेले जिल्हे 


मुंबई - ५.५४
नंदुरबार - ४.४८
सोलापुर- ४.३५
अकोला- ४.२४
लातूर- ३.८३
जळगाव- ३.७८
रत्नागिरी- ३.६९


राज्याचा मृत्यूदर- ३. ३५