Gadchiroli Crime :  नुकतेच दहावीचे निकाल लागले आहेत. दहावीच्या निकालाची प्रत आणण्यासाठी शाळेत गेलेल्या मुलीसह अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.  आदिवासी जमातीतील या विद्यार्थीनीवर दोन तरुणांनी बलात्कार केला आहे. अवघ्या काही तासात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. गडचिरोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोशन गोडसेलवार (वय 23) राहणार आणि निहाल कुंभारे (वय 24 वर्षे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पीडित मुलगी एका शाळेत शिकत होती. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र घेण्यासाठी शनिवारी ती शाळेत गेली होती. शाळेतून परत येताना तिच्यावर झाला आहे. 


निहाल कुंभारे याने तिला एका खोलीवर नेले. संध्याकाळी रोशन गोडसेलवार आणि निहाल कुंभारे यांनी त्या मुलीला बळजबरीने दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पहाटे तिला येथील चौकात सोडून दिले. भेदरलेल्या मुलीने चौकात आपल्यावरील अत्याचाराची जोरजोरात वाच्यता केली.


यानंतर ही आपल्या गावी आली. यानंतर तिने कुटुंबीयांना ही घटना सांगितली. कुटुंबीयांनी पीडित मुलीसह पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी पीडितेचे जबाब नोंदवून तपास अहेरी पोलिसांकडे वर्ग केला. रविवारी रात्री उशिरा अहेरी पोलिसांनी आरोपी रोशन गोडसेलवार आणि निहाल कुंभारे यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली.


अहमदनगरमध्ये एका खाजगी बस चालकाला प्रवाशाकडून मारहाण 


अहमदनगरमध्ये एका खाजगी बस चालकाला प्रवाशाकडून मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिसात 8 ते 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खिडकी बंद करण्यास सांगितल्यामुळे ही मारहाण झाल्याचं तक्रारीत म्हटल आहे.


कर्जबाजारी झाल्याने चोरीचा रस्ता निवडला


कर्जबाजारी झाल्याने चोरीचा रस्ता निवडणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.  रोशन नथू पाटील (वय 29 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. रोशन हा  भिवंडीच्या दौडा वडवली परिसरात राहणार आहे. आरोपीने भिवंडी वरून कल्याण स्टेशन गाठले. रात्रीच्या अंधारात रेल्वे स्टेशनची पूर्ण पाहणी करून अंधारातुन येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाश्याची दबा धरून बसला होता. रात्री तीनच्या दरम्यान त्याला एक महिला प्रवासी सोन्याचा हार घालून येताना दिसली आरोपीने अंधाराचा फायदा घेत तिच्या गळ्यातील हार खेचून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने आरडाओरडा करत चोरट्याचा पाटला सुरू केला महिलेचा आरडाओरडा ऐकून स्टेशन परिसरात तैनात असलेल्या कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपीचा पाठलाग आरोपीला रंगेहात अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून दीड लाख रुपये किमतीचा सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले.