Loksabha Election 2024 : मुलगा की नवरा? अमोल कीर्तिकरांची मशाल की गजानन कीर्तिकरांचं धनुष्यबाण? या वादात आई मेघना कीर्तिकर यांनी शेवटी आपल्या मुलाचीच बाजू घेतली.  उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याच पारड्यात त्यांच्या मातोश्रीनं मत टाकलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत.. तर आपले पती शिवसेना नेते आणि विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना त्यांनी चक्क घरचा आहेर दिला. तुम्ही वरिष्ठ असून एकनाथ शिंदेंना सलाम ठोकणार का? असा बोचरा सवाल त्यांनी मिस्टर कीर्तिकरांना उद्देशून केला.


गजानन कीर्तिकरांचा अपवाद वगळता सगळ्या कीर्तिकर कुटुंबानं अमोल यांनाच पाठिंबा दिलाय. त्यामुळं कुटुंबात मिस्टर कीर्तिकर एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय. आपला अजित पवार झाल्याचंच त्यांनी यावेळी सांगितले.  गजानन कीर्तिकर हे उत्तर पश्चिम मुंबईचे मावळते खासदार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाणं पसंत केलं.. मात्र त्यांचा हा निर्णय कीर्तिकर कुटुंबाला रूचलेला नाही, हेच यानिमित्तानं स्पष्ट झालं.


गजानन कीर्तिकर यांना सांगितलं होतं की शिंदे गटात जाऊ नका असा मोठा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. तुम्ही वरिष्ठ असून एकनाथ शिंदेंना सलाम ठोकणार असा सवाल मी त्यांना विचारला होता असंही गजानन कीर्तिकर यांच्या पत्नी म्हणाल्या आहेत.. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर रिंगणात उभे आहेत. त्यांना त्यांच्या आईसह सर्व कुटुंबियांनीच पाठिंबा दिलाय. मात्र दुसरीकडे शिंदे गटात गेलेले गजानन कीर्तिकर कुटुंबात एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय. मी अजित पवारांसारखाच आमच्या कुटुंबात एकटा असल्याचं विधान गजानन कीर्तिकर यांनी केलंय.. तसंच ईडीच्या भीतीमुळे आपण शिंदेंसोबत गेलो नसल्याचं स्पष्टीकरणही गजानन कीर्तिकर यांनी दिलंय.


मुंबईत आरे मतदान केंद्रावर संध्याकाळी रवींद्र वायकर यांची कन्या दाखल झाली. यावेळी आरे मतदान केंद्रात मोठी गर्दी झाली. यावेळी ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट समोरासमोर येण्याची शक्यता पाहून, तातडीनं निवडणूक अधिका-यांनी दोन्ही पक्षांना समजावण्याचा प्रयत्न केला.