जालन्यात जुगार अड्ड्यावर धाड; २० जणांना अटक
जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांची धाड टाकून २० जणांना अटक केली. आरोपींमध्ये एसआरपीएफचे तीन जवान, एक टीसी, सरपंच आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
जालना : जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षकांची धाड टाकून २० जणांना अटक केली. आरोपींमध्ये एसआरपीएफचे तीन जवान, एक टीसी, सरपंच आणि व्यापाऱ्यांचा समावेश आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक रामनाथ पोकळे यांनी शहरातील भोकरदन नाका परिसरातील वातानुकुलीत जुगार अड्डयावर धाड टाकून २० प्रतिष्ठित आरोपींना अटक केलीय.आरोपींच्या ताब्यातून रोख एक लाख २० हजार रूपयांसह आठ मोटार सायकली २० मोबाईल, विदेशी दारू, फर्नीचर असा एकूण साडेसहा लाखांचा ऐवज देखील जप्त करण्यात आलाय. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी स्वतःधाड टाकून ही कारवाई केलीये.
रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली.या कारवाईत एक टीसी आणि सरपंचांसह,व्यापारी, तीन एसआरपीएफच्या जवानांना देखील जुगार खेळताना पकडण्यात आलंय.दरम्यान ज्या एका इंग्लिश स्कुलमध्ये हा जुगारअड्डा सुरू होता.ही इंग्लिश स्कूल राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नेत्याची आहे. पकडलेल्या आरोपींवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.