DIY Ganesh Idol: या सोप्या टिप्स वापरा आणि घरीच बनवा गणरायाची सुबक, रेखीव इको फ्रेंडली मूर्ती
गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झालेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वांसाठी खास असणार आहे.
Eco friendly ganesh idol making tips: गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन पोहोचला आहे. अशात गणरायाच्या आगमनाची आतुरता सर्वांनाच आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झालेला नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव सर्वांसाठी खास असणार आहे.
महाराष्ट्रात घराघरात गणेशाची मूर्ती बसवून अकरा दिवस बाप्पाची पूजा केली जाते. बाप्पाची शास्त्रानुसार पूजा, बाप्पासाठी खास डेकोरेशन, गोडाचा नैवेद्य बनवला जातो. अकराव्या दिवशी गणरायाला वाजत गाजत, मिरवणूक काढून बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जातो.
पाण्यात बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केल्याने जलप्रदूषण होऊ शकतं, म्हणून अनेकजण पर्यावरणपूरक मूर्तींच घेणं पसंत करतात.
मात्र, तुम्ही आता घरच्या घरी बाप्पाची पर्यावरणपूर्वक मूर्ती तयार करू शकतात.ही मूर्ती कशी बनवाल? जाणून घ्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
कशी बनवाल गणेशाची मातीची मूर्ती?
- घरी इको फ्रेंडली गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी तुम्ही शाडू मातीचा वापर करू शकतात. शाडू माती तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होते.
- मूर्ती बनवण्यासाठी सर्वात आधी एक छान लाकडी चौकोनी तुकडा निवडा ज्यावर मूर्तीची स्थापना करणार आहेत. यासाठी तुम्ही पाटही घेऊ शकतात.
- मूर्ती बनवण्याआधी शाडू मातीला व्यवस्थित गाळून घ्या, त्यात काही खडे नाहीत ना, हेही तपासून घ्या.
- त्यानंतर मातीचा कणकेसारखा घट्ट गोळा बनवून घ्या.
- मातीचा गोळा तयार करून झाल्यानंतर त्याला काहीवेळ सेट होण्यासाठी ठेवा. एक तासभर गोळा तसाच ठेवा.
- तासाभरानंतर तुम्ही गणेशाच्या मूर्तीला आकार देण्यास सुरुवात करू शकतात
- मातीला गणेशाचं रूप देण्यासाठी लहानशी सोंड, हात, पाय जोडून माती सुकण्यासाठी ठेवावी
- मातीची गणेशाची मूर्ती सुकल्यावर त्यावर तुम्ही वॉटर कलरचा वापर करून मूर्ती छान पेंट करू शकतात.
- महत्त्वाची टीप म्हणजे वॉटरकलर मातीवर टिकावे म्हणून तुम्ही त्यात फेव्हिकॉल मिक्स करू शकतात.
- छान रंगवल्यानंतर तुम्ही फुलांचा हार आणि मोत्याचा माळेने ही मूर्ती सजवू शकतात.
Ganesh Chaturthi 2022 DIY tips to make cute eco friendly ganesh idol at home