चाकरमान्यांसाठी मोठी बातमी! गणपतीला गावी जाताना पाळावे लागणार `हे` नियम
गावी जाण्याकरता चाकरमान्यांना पाळावे लागणार काही नियम
मुंबई : यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरीही ऑक्टोबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. असं असताना आता गणेशोत्सवाकरता गावी जाणाऱ्या चाकरमान्यांकरता कोरोना चाचणी म्हणजे आरटीपीसीआर चाचणी महत्वाची असणार आहे. यामुळे चाकरमान्यांचा हिरमोड झाला आहे.
दरवर्षी गणेशोत्सवाकरता कोकणात जाणार मोठा चाकरमानीवर्ग आहे. अगदी जून, जुलैपासूनच चाकरमान्यांची लगबग सुरू होते. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी 1700 एसटी गाडयांचं आरक्षण
ठेवण्यात आलं आहे. तसेच परतीच्या आरक्षणालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र चाकरमान्यांकरता कोरोना टेस्ट बंधनकारक असल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांकरता मोठं ऑनलाईन बुकींग करण्यात आलं आहे. 1700हून अधिक गाड्यांचं आरक्षण आतापर्यंत झालं आहे. कोकणात प्रवेश करताना चाकरमान्यांची होणार कोरोना चाचणी. यामुळे चाकरमान्यांकडून प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
गणेशात्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी आतापर्यंत १,७००हून अधिक गाडय़ांचे आरक्षण झालं आहे. परतीच्या आरक्षणासाठीही चांगला प्रतिसाद मिळतोय... एसटी महामंडळाने मुंबई, ठाणे, पालघरमधून कोकणात जाण्यासाठी आणि कोकणातून येण्यासाठी जादा बसगाडय़ांची घोषणा केली. ठाणे विभागातून सर्वाधिक ५६४ आणि मुंबई विभागातील विविध आगारांच्या ४६५ गाडय़ांच्या आरक्षणाला प्रतिसाद मिळाला आहे. मुंबईतल्या चाकरमान्यांची कोकणच्या वेशीवर कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसंच प्रवासावेळी दोन लसीचे डोस घेतल्याचं सर्टीफिकेट आणि ७२ तासांचा आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक करण्यात आलाय . त्यामुळे चाकरमानी मात्र नाराज आहेत.