Ganeshotsav 2024 Kokan Railway Ticket Booking: गणेशोत्सव आणि कोकण यांचे वेगळेच नाते आहे. गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी दोन महिने आधीपासूनच तयारी करावी लागते. रेल्वेने कोकणात जाणं म्हणजे खूप आधीपासूनच तिकिटांचे बुकिंग करावे लागते. रेल्वे प्रशासनदेखील गणेशोत्सवासाठी जादा गाड्या सोडते. चाकरमानी कोकणात जाण्यासाठी जास्तकरुन रेल्वेवरती अवलंबून असतात. कारण रस्ते मार्गाने कोकणात जायचं म्हटलं की प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यामुळं अनेक जण रेल्वेवर अवलंबून असतात. आता कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग 10 मेपासून सुरू होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरवर्षी, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे यासह मोठ्या शहरातील नागरिक गणपतीसाठी कोकणात दाखल होतात. यंदा गणरायाचे आगमन 7 सप्टेंबर रोजी होत आहे. त्यामुळं त्याच्या 120 दिवस आधीपासूनच म्हणजे 10 मेपासून कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे बुकिंग सुरू होणार आहे. त्यामुळं यंदा चाकरमान्यांना कन्फर्म तिकिट मिळण्याची दाट शक्यता आहे. 


दरवर्षी गणेशोत्सवाचे तिकिट मिळवण्यसाठी तिकिट खिडकींवर सकाळपासून रांगा लावाव्या लागतात. मात्र, तिकिट खिडकी उघडताच कन्फर्म तिकिटाची आशाही संपून जाते. गणपतीसाठी यंदा 10 मेपासून तिकिटाचे बुकिंग सुरू करण्यात आल्यामुळं नागरिकांनी लवकरात लवकर तिकिटांचे बुकिंग करावे, असे अवाहन करण्यात येत आहे. तसंच, गणेशोत्सव स्पेशल गाड्याही लवकरच सोडण्यात येतील. व तशे जाहीर करण्यात येईल, असेही सांगितले जात आहे. 


कसे असेल शेड्युल 


रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार शनिवार 4 मे 2024 रोजी 1 सप्टेंबरचं रेल्वे आरक्षण सुरु होईल. तुम्ही आयआरटीसी व अँपवरून बुकिंग करु शकता. रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या मार्गावर जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं बुकिंग मंगळवार 7 मे रोजी सुरु होईल. 6 सप्टेंबर रोजी हरतालिका असून याच बुकिंग गुरुवारी 9 मे पासून सुरु होईल. 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थी असून यादिवशी घरोघरी गणरायांचे आगमन होईल. तेव्हा 7 सप्टेंबरचं रेल्वे बुकिंग शुक्रवार 10 मे रोजी सुरु होईल.


आरक्षण दिनांक प्रवास सुरू होण्याचा वेळ
शनिवार ४ मे, २०२४       रविवार 1 सप्टेंबर, २०२४
रविवार ५ मे, २०२४ सोमवार 2 सप्टेंबर, २०२४
सोमवार ६ मे, २०२४ मंगळवार 3 सप्टेंबर, २०२४
मंगळवार ७ मे, २०२४ (रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग) बुधवार 4 सप्टेंबर, २०२४
बुधवार ८ मे, २०२४ गुरुवार 5 सप्टेंबर, २०२४ (हरतालिका तृतीया)
गुरुवार ९ मे, २०२४ शुक्रवार 6 सप्टेंबर, २०२४ (श्रीगणेश चतुर्थी)
शुक्रवार १० मे, २०२४ शनिवार 7 सप्टेंबर, २०२४ (ऋषिपंचमी)
शनिवार ११ मे, २०२४ रविवार 8 सप्टेंबर, २०२४
रविवार १२ मे, २०२४ सोमवार 9 सप्टेंबर, २०२४
सोमवार १३ मे, २०२४ (मावळ, पुणे) मंगळवार 10 सप्टेंबर, २०२४
मंगळवार १४ मे, २०२४ बुधवार 11 सप्टेंबर, २०२४ (गौरी विसर्जन)
बुधवार १५ मे, २०२४ गुरुवार 12 सप्टेंबर, २०२४
गुरुवार १६ मे, २०२४ शुक्रवार 13 सप्टेंबर, २०२४
शुक्रवार १७ मे, २०२४ शनिवार 14 सप्टेंबर, २०२४
शनिवार १८ मे, २०२४ रविवार 15 सप्टेंबर, २०२४
रविवार १९ मे, २०२४ सोमवार 16 सप्टेंबर, २०२४ (अनंत चतुर्दशी)
सोमवार २० मे, २०२४ (पालघर, ठाणे, मुंबई, कल्याण, भिवंडी) मंगळवार 17 सप्टेंबर, २०२४
मंगळवार २१ मे, २०२४ बुधवार 18 सप्टेंबर, २०२४
बुधवार २२ मे, २०२४ गुरुवार 19 सप्टेंबर, २०२४
गुरुवार २३ मे, २०२४ शुक्रवार 20 सप्टेंबर, २०२४
शुक्रवार २४ मे, २०२४ शनिवार 21 सप्टेंबर, २०२४
शनिवार २५ मे, २०२४ रविवार 22 सप्टेंबर 2024