NEET Exam Scam Latur :लातूर NEET पेपर फुटी प्रकरणातला बहुचर्चित आरोपी गंगाधर अखेर सीबीआयच्या हाती लागलाय.... दिल्लीत वास्तव्याला असलेला गंगाधर NEET घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार असल्याचं सांगितलं जातं. सीबीआय तपासात या गंगाधरबाबत धक्कादायक माहिती उघड झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

NEET पेपर फूटी प्रकरणातील मास्टर माइंड आणि मुख्य आरोपी गंगाधरला अखेर लातुरच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. CBI ने त्याला न्यायालयात  हजर केलं. न्यायालयाने गंगाधरला दोन दिवसांची CBI कोठड़ी सुनावलीय.  आंध्र प्रदेशात गंगाधर एन . गंगाधर अप्पा या नावाने रहात होता , तर बंगळुरु CBI च्या रिकॉर्डवर गंगाधरचं नाव नंजुनधप्पा गंगाधर असं नमूद करण्यात आलंय .सध्या गंगाधरची  CBI कडून कसुन चौकशी केली जातेय .या प्रकारणातील इरण्णा हा आरोपी अद्याप फरार असून CBI त्याच्या मागावर आहे .


NEET घोटाळ्याचा पर्दाफाश 


लातूरमधील दोघा शिक्षकांना हाताशी धरून त्यानं NEET गुणवाढीचं आमीष दाखवलं.  लातूरच्या शिक्षकांच्या मध्यस्थीनं विद्यार्थी-पालकांकडून लाखो रुपये उकळले. दिल्लीत राहणारा हा गंगाधर मराठवाड्यातला असल्याची चर्चा होती. मात्र, अटकेतील आरोपींनी तपास यंत्रणांची दिशाभूल केल्याचं उघड झालंय


सीबीआयनं ज्याच्या मुसक्या आवळल्या तो गंगाधर दक्षिणेतला म्हणजे तमिळनाडूचा निघाला एन. गंगाधर आप्पा नंजुड आप्पा असं त्याचं नाव आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातही एन. गंगाधर आप्पा आणि एजंटांचं मोठं नेटवर्क असल्याचा संशय आहे
 NEET पेपरफुटी घोटाळ्याचं सगळा काळा कारभार उजेडात येणार आहे. 


सीबीआयनं गंगाधरकडून मोबाईल फोन आणि NEET परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं जप्त केलीत. त्या मोबाईलमधून फसवणुकीचे अनेक धक्कादायक प्रकार उजेडात आलेत. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले दोन शिक्षक आणि मध्यस्थ इरण्णा कोनगलवार यांच्या मतदीनं गंगाधरनं पेपरफुटीचं रॅकेट कसं चालवलं होतं, याचा पर्दाफाश होणाराय... गंगाधरला ताब्यात घेतल्यानंतर सीबीआय आता इरण्णाच्या मागावर आहे. तो हाती लागल्यानंतर NEET पेपरफुटी घोटाळ्याचं सगळा काळा कारभार उजेडात येण्याची शक्यता आहे.