Pune Gaja Marne News :  पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marne) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गजा मारणेवर पुणे पोलिसांची मेहनरजर असल्याचं समोर येत आहे. गजा मारणे याच्यावर मोक्का अंतगर्त गुन्हा दाखल आहे. मात्र, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.  गजा मारणे याला मोक्कातून वगळण्यासाठी पुणे पोलिसांनी 169चा रिपोर्ट सादर केला आहे. या रिपोर्टमुळे पुणे पोलीस राजकीय दबावाला बळी पडलेत का? असा सवाल उपस्थित होत आहे.  पोलिसांच्या या भमिकेमुळे एकच चर्चा रंगली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतविलेल्या 4 कोटी रुपयांच्या बदल्यात 20 कोटी रुपयांची मागणी करुन व्यावसायिकाचं अपहरण केल्याच्या प्रकरणात गुन्हे शाखेनं गुंड गजानन मारणेच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी गजा मारणेसह 14 जणांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.  मात्र, याच गजा मारणेला आता मोक्कातून वगळण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं दिसत आहे.  


जेलमधून सुटल्यावर जंगी मिरवणुक काढल्यामुळे चर्चेत आला होता गजा मारणे 


जेलमधून सुटल्यावर जंगी मिरवणुक काढल्यामुळे गजा मारणे चर्चेत आला होता. खुनाच्या गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी गजा मारमे याची मुक्तता झाली होती. यानंतर त्याची  जंगी मिरवणूक काढल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. गजा मारणे नवी मुंबईतील तळोजा तुरुंगात कैद होता. येथून त्याची सुटका झाल्यानंतर  त्याच्या टोळीकडून त्यांच जोरदार स्वागत करण्यात आल होते. 


तब्बल 300 वाहनांचा ताफा घेऊन गजा मारणे पुण्यात दाखल झाला. तळोजा कारागृह ते पुणे अशा त्याच्या मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. पोलिसांच्या नाकावर टिच्चून मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर चारही लेन ब्लॉक करत ही मिकवणुक निघाली होती.  


खून प्रकरणात झाली होती गजा मारणेला अटक


अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली होती. 3 वर्षे या प्रकरणाचा खटला सुरु होता. मात्र, सबळ पुराव्या अभावी गजा मारणे याची मुक्तता झाली. मात्र, जेलमधून सुटल्यावर त्याची ही एन्ट्री दहशत माजवण्याचा प्रयत्न करणारी अशी होती. यावरुन बराच वाद झाला. थेट पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. यानंतर या प्रकाराची गांधीर्याने दखल  घेत तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले होते.