या मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा
37 वर्षांपासून या मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा आहे.
सांगली : जिल्ह्यातील गोटखिंडी हे गाव राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. कारण इथं हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन सण साजरे करतात. गोटखिंडी इथल्या मशिदीत तर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. गेल्या 37 वर्षांपासून या मशिदीत गणपती बसवण्याची परंपरा आहे.
न्यू गणेश तरुण मंडळाच्या वतीने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. हिंदू आणि मुस्लिम एकत्र येऊन नऊ दिवस बाप्पाची मनोभावे पूजाअर्चा करतात. यंदा तर गणेशोत्सवाच्या काळात बकरी ईद आलीय. मात्र गणेशोत्सव असल्यानं बक-याची कुर्बानी न देता मुस्लिम बांधव केवळ नमाज पठण करुन ईद साजरी करणार आहेत.