रत्नागिरी : Ratnagiri Ganpati Immersion: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणपती विसर्जनाच्यावेळी गर्दी होऊ नये आणि शांततेत विसर्जन व्हावे म्हणून, जिल्ह्यात मनाई आदेश जारी करण्यात आलेत आहे. रत्नागिरी शहरातील मांडवी आणि भाट्ये किनारी गणपती विसर्जन करणाऱ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. अन्य लोकांसाठी इथे आजपासून 19 तारखेपर्यंत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन पाटील यांनी जिल्ह्यात मनाईचे आदेश जारी केले आहेत. (Ganpati Immersion: District Collector issues restraining order in Ratnagiri)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गणपती विसर्जनाशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी जाणाऱ्या लोकांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(4) 43 नुसार मनाई आदेश काढण्यात आले आहेत. मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (4 )नुसार पोटकलम 1 अन्वये अधिकार दिलेल्या प्राधिकरणास जाहीर नोटीस कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा सार्वजनिक प्रयोजनासाठी तात्पुरती राखून ठेवता येईल आणि असा प्राधिकार विहित करील त्यामुळे शर्तीनुसार प्रवेश असलेल्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याहीबाबतीत कोणत्याही व्यक्तीला अशा राखून ठेवलेल्या जागेत प्रवेश करण्यास मनाई करण्यात केली जाईल असे तरतूद आहे.


रत्नागिरी शहरातील मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनारी गणपती विसर्जनाशिवाय इतर लोकांना फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. अन्य लोकांना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी व गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये या हेतूने मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(4) व 43 अनुभवे प्रवेशास बंदी करण्यात आली आहे, असे जिल्ह्याधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.