औरंगाबादचा कचरा प्रश्न बिकट, ग्रामस्थांशी चर्चा निष्फळ
कचराकोंडी कायम राहण्याचीच चिन्हं दिसत आहेत. नारेगाववासीयांशी पालकमंत्री दीपक सावंतांची चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आंदोलनासोबतच आरोग्याची समस्याही बिकट होणार आहे.
औरंगाबाद : कचराकोंडी कायम राहण्याचीच चिन्हं दिसत आहेत. नारेगाववासीयांशी पालकमंत्री दीपक सावंतांची चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आंदोलनासोबतच आरोग्याची समस्याही बिकट होणार आहे.
कचराकोंडी फोडण्यात अपयश
औरंगाबादमध्ये सुरू असलेली कचराकोंडी फोडण्यात राज्य सरकारला अपयश आलं आहे. कचराप्रश्नी कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही अशी ठाम भूमिका नारेगावच्या ग्रामस्थांनी घेतली आहे. तर नारेगावात कचरा टाकू देणार नाही असा निर्धार व्यक्त करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्राही कायम ठेवला आहे.
विनंती फेटाळून लावली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मध्यस्थ म्हणून औरंगाबादचे पालकमंत्री दीपक सावंत यांनी आंदोलनस्थळी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन, हा प्रश्न सोडवण्यासाठी काही महिने अवधी देण्याची विनंती केली. मात्र नारेगावच्या गावक-यांनी ही विनंती सपशेल फेटाळून लावली.
कचरा प्रश्न पेटणार
तसंच तोडग्यासाठी होणा-या विभागीय आयुक्त कार्यालयातल्या बैठकीकडेही त्यांनी पाठ फिरवली. एकंदरीत हे आंदोलन आता चांगलंच पेटणार असं चित्र दिसतंय.