LPG Cylinder Price Hike: सहागृहात आज जो गोंधळ झाला तो सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सुरू आहे, असं तुम्हाला वाटेल. मात्र असं मुळीच नाही...ही खडाजंगी ना शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आहे ना महागाईनं पिचलेल्या जनतेसाठी...हा गोंधळ सुरू आहे संजय राऊतांच्या वादग्रस्त विधानवरून...हे तेच राजकारणी आहेत ज्यांनी मंगळवारी कांदा आणि कापूस प्रश्नावरून रान उठवलं होतं. शेतक-यांना न्याय मिळेपर्यंत गप्प बसणार नाही अशी भूमिका घेणारे पुढारी आज मात्र वेगळ्याच रूपात पाहायला मिळाले. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे कांदा, कापूस आणि धान उत्पादकांची स्थिती अतिशय बिकट झालीय. तर दुसरीकडे गॅस सिलिंडर महागल्यानं गृहिणी वर्गाचं बजेट पुरतं कोलमडलंय. आपल्या न्याय हक्कासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आपली व्यथाच सरकार दरबारी मांडत नसल्यानं गृहिणींमध्येही नाराजीचा सूर दिसून येतोय. 


कांदा, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी कोसळलेल्या दरांमुळे मेटाकुटीला आलाय. मात्र शेतमालाच्या दरवाढीसाठी ना ठोस धोरण ठरवण्यात येतंय ना अनुदानाचा निर्णय घेण्यात येतोय. राजकीय मुद्यांवर शांततेनं तोडगा काढून विधीमंडळात सामान्यांच्या प्रश्न सोडवायला हवेत अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जातेय. 


जुलै 2022 नंतर सिलिंडरची दरवाढ


याआधी 1 जुलै 2022 ला घरगुती सिलिंडरच्या किमती बदलल्या होत्या. त्यानंतर आज 1 मार्च 2023 पासून घरगुती सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. परिणामी 1 एप्रिल 2017 ते 6 जुलै 2022 याकालावधीत एलपीजीच्या किमती 58 वेळा बदलण्यात आल्या आहेत. म्हणजेच एलपीजी सिलिंडरच्या दरात 45 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे. एप्रिल 2017 मध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 723 रुपये होती तर जुलै 2022 पर्यंत त्यात 45% वाढ होऊन किमती 1053 रुपयांवर पोहोचल्या.