Lavni Dancer Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील...असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या तरूणाईला घायाळ करते. महाराष्ट्राची लावणी डान्सर गौतमी (Gautami Patil) पाटीलची एक झकल पाहण्यासाठी पब्लीक वेडी होते. कुणी छतावर चढतं तर कुणी झाडावर.  गौतमी लावणीच्या स्टेजवरुन आता थेट राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहे. गौतमी पाटील राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. राजकारणात प्रवेश करण्याबाबत स्वत: गौतमीनेच खुलासा केला आहे. 


राजकीय प्रवेशाबाबत काय म्हणाली गौतमी पाटील


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाटील आडनावावरून टार्गेट करणा-यांना गौतमी पाटीलनं पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत. मात्र, संभाजीराजे छत्रपतींच्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. मला राजकारणातलं काही कळत नाही आणि त्यात पडायचं देखील नाही, अशा शब्दांत तिने राजकीय पक्ष प्रवेशाच्या चर्चेचला पूर्णविराम दिला.


गौतमी पाटील राजकीय नेते मंडळींच्या टार्गेटवर


अश्लिल डान्स स्टेप्समुळे गौतमी पाटील चर्चेत आली. गौतमीच्या डान्सचे व्हिडिओ व्हायरल झाले. तसेच हुल्लडबाजीमुळे गौतमीचे डान्स शो चर्चेत आले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी तर, थेट गौतमीचे कार्यक्रमच ठेवू नका असे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. छोटा पुढारी घन:शाम दराडेने देखील गौतमीवर टीका केली होती. 


गौतमी पाटीलने मागितली अजित पवार यांची माफी


लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलनं अजित पवारांची माफी मागितलीय. अजितदादा मोठे नेते आहेत, त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही. झालेल्या चुकांची माफी मागितली तरीही लोक जुने व्हिडिओ काढून ट्रोल करतात असं गौतमीने म्हंटलंय. अलिकडेच अश्लील डान्स कार्यक्रमांच्या आयोजनावरून अजित पवारांनी पदाधिका-यांना खडसावलं होतं. पदाधिका-यांनी असे कार्यक्रम आयोजित करू नयेत अशी सूचनाही अजित पवारांनी केली होती. त्यानंतर गौतमी पाटीलने सपशेल शरणागती पत्करली होती.


महाराष्ट्राचा बिहार करु नका; छोट्या पुढाऱ्याचा इशारा


गौतमी ताई महाराष्ट्राचा बिहार करु नका असं आवाहन छोटा पुढारी घनश्याम दरोडेनं केले होते. राज्यात सध्या विविध जत्रांमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येते. त्यालाही तुफान गर्दीही होते. तर,  अनेक ठिकाणी राडाही झालेला पाहायला मिळतो. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावर लावणी कलाकारांनीही आक्षेप घेतलाय. मात्र आता छोटा पुढारी घनश्याम दरोडेनं थेट गौतमी पाटीलला आव्हानच दिले होते.