ZP School: झेपडीच्या शाळेतील मुलांना लागलेय जर्मनी भाषेचं वेड; विद्यार्थ्यांना ही भाषा शिकवतयं कोण?
ZP School: बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी,हिंदी, इंग्रजी या भाषा शिकवल्या जातात. मात्र, बदलत्या युगामध्ये माहिती तंत्रज्ञान याचा वाढणारा प्रभाव यामुळे डिजीटल साधनांचा उपयोग वाढला असल्याने यातून शिक्षणाची देखील क्रांती झाली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : ग्रामीण तसेच शहरी भागात इंग्रजी शाळांमध्ये जाण्याचा ओढा वाढलेला असतानाच जिल्हा परिषदेच्या शाळा देखील विविध उपक्रम आता राबवत आहेत बीड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये चक्क जर्मन भाषेतील धडे (German Language Training) गिरवले जातात. जर्मन भाषा शिकण्याचा बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा पॅटर्न पाहून सगळेच शॉक झालेत (Zilla Parishad School in Beed ).
बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी,हिंदी, इंग्रजी या भाषा शिकवल्या जातात. मात्र, बदलत्या युगामध्ये माहिती तंत्रज्ञान याचा वाढणारा प्रभाव यामुळे डिजीटल साधनांचा उपयोग वाढला असल्याने यातून शिक्षणाची देखील क्रांती झाली असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.
जर्मनीला गेलेल्या एका तरुणाने थेट जिल्हा परिषदेतल्या शाळेमध्ये जर्मन भाषा शिकवायला सुरुवात केलीय. केदार जाधव असं या तरुणाचं नाव आहे. केदार जाधव हे आता बीड जिल्ह्यातील उमरद खालसा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांना जर्मन भाषेचे धडे देत आहेत. ऑनलाइन बैठकीच्या माध्यमातून नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू झालेल्या या वर्गातील मुलं आता जर्मन भाषा बोलू लागले आहेत.
मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेमध्ये मग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना आता जर्मन भाषेची देखील गोडी लागली आहे. जर्मन भाषा शिकून आपण त्या देशांमध्ये जाऊ शकतो आपल्याला रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील अशी आशा आतापासूनच या मुलांना आहे. त्यामुळे इतर भाषांबरोबरच जर्मन भाषा शिकत असल्याने या विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकल्याचा नक्कीच फायदा होईल. जिल्हा परिषद शाळेमध्ये नवनवीन उपक्रम राबवून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यामधूनच या उपक्रमाची सुरुवात शाळेत करण्यात आली आहे.मागील काही महिन्यांपासून या शाळेमध्ये जर्मन भाषा शिकण्याची आवड काही मुलांना निर्माण झाली आणि त्यातूनच आज हे मुलं जर्मन भाषेचे धडे गिरवत आहेत.
शिकण्याची जिद्द विद्यार्थ्यांमध्ये असते. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असे नवनवीन प्रयोग केले तर वेगवेगळ्या भाषा विद्यार्थी शिकतील आणि विदेशांमध्ये जाऊन देखील भारताचा डंका हे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी नक्कीच वाजवतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.