नगरसेवकाच्या जाचाला कंटाळून कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न
ज्ञानेश्वर शेलार यांची प्रकृती चिंताजनक
प्रताप नाईक, झी मीडिया, सातारा : साताऱ्यातील नगरसेवकाच्या त्रासाला कंटाळून घंटागाडीच्या चालकानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं पुढे येतंय. ज्ञानेश्वर शेलार या कचरा उचणाऱ्या घंटा गाडीचा चालकाचं नावं आहे. ज्ञानेश्वरनं विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयातल्या अति दक्षता विभागात हलवण्यात आलंय.
साताऱ्यातील सदरबाझर या भागातील नगरसेवक विशाल जाधव यांनी वारंवार त्रास दिल्यानंच ज्ञानेश्वरनं आत्महत्येसारखं गंभीर पाऊल उचललं, असा आरोप ज्ञानेश्वरचा भाऊ सुनील शेलार आणि आई शकुंतला शेलार यांनी केलाय. कोणत्याही वेळी कामावर बोलावणं, कोणतंही काम करायला लावणं, पगारातील पैसे मागणं असे आरोप जाधव यांच्यावर करण्यात आलेत.
शुक्रवारी जाधव यांनी ज्ञानेश्वरला अचानक काम बंद करायला लावल्यामुळे ज्ञानेश्वर शेलार याने विष घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. या प्रकरणी विशाल जाधव या नगरसेवकावर तत्काळ कारवाई केली जावी, अशी मागणीदेखील त्यांनी केलीय.
सध्या असून त्यांच्यावर सातारा जिल्हारुग्णायात उपचार सुरू आहेत.