शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या हत्येनं महाराष्ट्र पुरता हादरुन गेला आहे. या हत्याकांडावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसने स्वतःवर आत्महत्या केली. मॅरिस यांच्या ऑफिसमध्ये या दोघांनी फेसबुक लाईव्ह केले होते. हे फेसबुक लाईव्ह सुरु असतानाच घोसाळकरांवर मॉरिसने गोळीबार केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणावरुन राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच मराठी मनोरंजनसृष्टीमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मराठी मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अनघा भगरेने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अनघाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये घोसाळकरांच्या हत्येबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या या घटना अत्यंत दुर्दैवी आहेत. आपण या घटनांकडे अजून किती दुर्लक्ष करणार आहोत? अशा कॅप्शनसहीत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. 



अभिषेक घोसाळकरांसोबत फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच मॉरिसने घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्या. या गोळीबारानंतर उपाचारांदरम्यान घोसाळकरांचा मृत्यू झाला. मागील दोन आठवड्यांमध्ये राजकीय वादातून गोळीबार झाल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी कल्याणच्या आमदाराने पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना ताजी अशताना घोसाळकरांची झालेली हत्या ही कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते, असा विरोधकांचा आरोप आहे. महाराष्ट्रातील गोळीबाराच्या घटनेमुळे राजकरणातही मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप केला जात आहे. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाही. महाराष्ट्रात गुन्हेगार मोकाट सुटले आहेत, अशी टीका विरोधकांनी मुख्यमंत्र्यांबरोबरच गृहमंत्री फडणवीसांना लक्ष्य करताना म्हटलं आहे.