Jalgaon News: भाजप नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यात गुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणी एकनाथ खडसे यांना 137 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या मुद्द्यावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांनी हा दंड वेळेत भरला नाही, तर एकनाथ खडसेंची संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाब गिरीश महाजन म्हणाल की , एकनाथ खडसेंनी त्यांच्या कुटुंबाकडून जमीन घेतली. त्यातून मुरुम उत्खनन केले. मात्र खडसेंनी जमिनीची रॉयल्टी भरली नाही. हा कोट्यावधी रूपाचा मुरुम विकला, खडसेंनी हा सर्व पैसा काळ्या मार्गाने घेतला आणि त्यावर त्यांनी रॉयल्टी दिल्याचा एकही पुरावा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे खडसेंना 137 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने खडसेंना फटकारले आहे. तसेच खडसेंना तातडीने 35 कोटींचा दंड भरावा लागणार आहे. खडसेंनी वेळेत दंड भरला नाही तर लीलावत यांच्याकडून त्यांची संपूर्ण मालमत्ता जप्त केली जाण्याची शक्यता गिरीश महाजनानी यांनी व्यक्त केली.


हे सुद्धा वाचा: शरद मोहोळच्या साथीदाराने घेतली श्रीकांत शिंदेंची भेट; वर्षा बंगल्यावर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा


तसेच यावेळी सत्ता असली की कोणी आपलं वाकडं करु शकत नाही आणि सत्ता गेली की काय होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी या गोष्टी केल्या असल्या तरी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन अशा गोष्टी बोलून ते किती नालायक आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या कृत्यामुळे त्यांचा जावई तुरुंगात जाऊन आलाय. स्वार्थ कुठे नेऊन ठेवतो हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. एकनाथ खडसे नेहमी फक्त दुसऱ्यांच्या भ्रष्टाचारावर बोलतात, खडसे हे स्वतः भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत, त्याची किंमत कशी सोसायची हे त्यांना माहीत आहे, असे गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


खडसेंमुळे जावई तुरंगात गेला


एकनाथ खडसेंवर गिरीश महाजनांची टिका आपण सत्तेत असालो की, कोणीही आपले वाकड करू शकत नाही. याचे हे उत्तम उदाहरण आहे. या गोष्टी खडसेंनी केल्या तरी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन कसे नालायक आहेत हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न करत असतात. या कृत्यामुळे खडसेंचा जावई तुरुंगात जाऊन आला. खडसे नेहमीच भ्रष्टाचारावर बोलतात. पण खडसे हे भ्रष्टाचाराचे जनक आहेत.